आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवा गाेलंदाज यश बोरकर (२/३९), प्रथमेश गावडे (५/३८) आणि प्रतिक तिवारी (३/२) यांनी यजमान महाराष्ट्र संघाला १९ वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत डावाने विजय मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने ‘ब’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर सिक्कीमवर एक डाव व १३५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या कालच्या ४ बाद ४७ वरून रविवारी सकाळी सिक्कीम संघाने दुसरा डाव सुरू केला. पहिल्या तासाभरातच त्यांचा डाव ९० धावात संपुष्टात आला. फलकावर ६० धावा असताना प्रथमेश गावडेने पाचवा बळी घेत झटका दिला. पुढच्याच षटकात यश बोरकरने सलग दोन बळी घेत सिक्कीमला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर महाराष्ट्राने प्रतीक तिवारी हा चौथा गोलंदाज वापरला. त्याने त्याच्या दुसऱ्या निर्धाव षटकात ३ बळी घेत सिक्कीम संघाचा डाव ९० धावावर संपवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग विकेट घेणाऱ्या प्रतिक तिवारीची हॅट््ट्रिक थोडक्यात हुकली, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणखी एक विकेट घेत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गुणतालिकेत अव्वलस्थानी, उपांत्यपूर्व फेरीची संधी महाराष्ट्राने ७ बोनस गुणांची कमाई करीत गुणतालिकेत २६ गुणासह सर्वोच्च स्थान पटकावले. यामुळे त्यांना उपांत्यपूर्व फेरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र संघाने मागील सामन्यात आसामविरुद्ध १८५ धावांनी, हैदराबादविरुद्ध १ डाव १२ धावांनी विजय मिळवला होता तर पुद्दुचेरी व सौराष्ट्र विरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली होती. स्पर्धेच्या ६ गटातील विदर्भ, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, बडोदा व पंजाब या संघांनी बाद फेरी गाठली आहे. त्यातील त्यांच्या निकालावर कोणते संघ थेट उपांत्यपूर्व फेरी गाठणार हे ठरेल, असे सांख्यिकी मिलिंद गोरे यांनी सांगितले.
संक्षिप्त धावफलक : सिक्कीम: पहिला डाव : १५.३ षटकात ९ बाद २४. महाराष्ट्र :पाहिला डाव : ४६ षटकात २ बाद २४९ घोषित. सिक्कीम : दुसरा डाव : ३४ षटकांत सर्व बाद ९० (अर्णव गुप्ता २५, रोशन प्रसाद २१, कुणाल गुप्ता २०, पूर्णा भट्ट १९, यश बोरकर २/३९, प्रथमेश गावडे ५/३८, प्रतिक तिवारी ३/२).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.