आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाचा धक्का:‘दक्षिण’मध्ये महाविकास आघाडीचाच बोलबाला ; मंद्रूप, निंबर्गी, आहेरवाडी येथे दारुण पराभव

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १२ ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीने सत्तापरिवर्तन करत बाजी मारली. भाजपची केवळ चार गावात सत्ता आली. आमदार सुभाष देशमुख यांच्या गटास धक्का देणारा हा निकाल आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची लढत झालेल्या सर्वांत मोठ्या मंद्रूप ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (कै) गोपाळराव कोरे यांचे घराणेच किंग ठरले. येथे आप्पाराव कोरे यांनी सत्ताधारी भाजपला धूळ चारली. तर निंबर्गीत काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी सत्ताधारी भाजपचा पराभव केला. येथे त्यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे सरपंच म्हणून विजयी झाले.

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मंगळवारी सकाळी मतमोजणी झाली. मंद्रूप ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. अनिता कोरे सरपंच म्हणून १०२१ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या प्रभावती हेळकर यांचा पराभव केला. काँग्रेसच्या शीतल राठोड तिसऱ्या स्थानी गेल्या. येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी सात सदस्य तर काँग्रेसचे तीन विजयी झाले.

आहेरवाडी येथे सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. येथे काँग्रेस व शिवसेनेच्या सुवर्णा नरसप्पा दिंडोरे सरपंच पदी विजयी झाल्या. सर्वाधिक सदस्यही याच आघाडीचे विजयी झाले. येथे भाजपचे पंचप्पा धनशेट्टी पराभूत झाले. कंदलगाव येथे सर्वपक्षीय आघाडीच्या शारदाबाई कडते सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांनी बहुजन आघाडीच्या बायडाबाई सलगरे यांचा पराभव केला.होनमुर्गी ग्रामपंचायतीत गुराण्णा तेली, नबीलाल निंबाळे, महेश पाटील, समशेर कादरी व सतीश शिंदे यांच्या सर्वपक्षीय आघाडीने विजय मिळविला. सरपंचपदी सुभाष तेली विजय झाले.

वांगी येथे महाविकास आघाडीने बाजी मारली. येथे सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. येथे सीताबाई खडाखडे सरपंच म्हणून निवडून आल्या. विंचूरमध्ये महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील ५९८ मते घेऊन सरपंच म्हणून विजय झाले. त्यांनी भाजप आमदार सुभाष देशमुख गटाचे अदित्य झाडबुके यांचा पराभव केला. शंकरनगरच्या सरपंचपदी सुभाष चव्हाण विजय झाले. चुरशीच्या लढतीत त्यांनी गजानन राठोड यांचा पाच मतांनी पराभव केला.

आचेगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप गटाची सत्ता आली. येथे विश्रांती पाटील या सरपंच म्हणून विजयी झाल्या. धोत्रीमध्ये काँग्रेसची सत्ता आली. येथे पाटील- यारगले गटाच्या वैशाली पाटील सरपंच म्हणून विजयी झाल्या. औज (मंद्रूप) ग्रामपंचायतीवर भाजपचे उंबरजे येळूरे गटाची सत्ता आली. सरपंच म्हणून मल्लिकार्जुन केरके विजय झाले. येथे काँग्रेसचे सिकंदरताज पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.बसवनगर येथे भाजपची सत्ता आली. सरपंच म्हणून निखिल राठोड विजयी झाले. गंगेवाडी येथे भाजपची सत्ता आली. सरपंच म्हणून प्रशांत जाधव विजयी झाले. याशिवाय बंकलगीत चंद्राम सगरे, रामपूरमध्ये वीरपाक्ष घेरडी व तोगराळी- गुर्देहळ्ळीत महेश पाटील सरपंच म्हणून विजयी झाले. या ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी व स्थानिक गटाने बाजी मारली.

निंबर्गीत हसापुरे गट वरचढ निंबर्गीमध्ये चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी सत्ताधारी भाजपला पराभूत केले. येथे त्यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे सरपंच म्हणून १४५ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे चन्नाप्पा बोरगी यांचा पराभव केला. येथे हसापुरे गटाचे सात तर भाजपचे सोमशंकर बिराजदार यांच्यासह तीन सदस्य विजयी झाले. या निवडणुकीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते. येथे आमदार सुभाष देशमुख यांना सुरेश हसापुरे वरचढ ठरले.

बातम्या आणखी आहेत...