आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आज भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात आंदोलन केले. संसद भवनात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी स्मृती इराणी यांनी गैरवर्तन केले, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी इराणी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. स्मृती इराणी यांनी ताबडतोब राजीनामा देऊन सोनिया गांधी यांची माफी मागावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
आंदोलनात सहभागी महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर म्हणाल्या, संसदेत झालेल्या वादाबद्दल खा. चौधरी यांनी माफी मागितल्यामुळे वादावर पडदा पडला आहे. तरीदेखील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह काही भाजप महिला खासदारांनी संसदेच्या आवारात सोनिया गांधी यांना गराडा घातला. गैरवर्तन करून हुज्जत घातली.
माफी मांगो स्मृती इराणी, स्मृती इराणी राजीनामा द्या, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. स्मृती इराणी यांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोंबे, प्रा. संघमित्रा चौधरी, अशोक कलशेट्टी, मुमताज तांबोळी, चंदा काळे, स्नेहल शिंदे, लता सोनकांबळे, नीता बनसोडे, पद्मा मटला,अनिता भालेराव, वैशाली गायकवाड, शैला पवार, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.