आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब रस्ता:आसरा चौक ते अमन चौक रस्ता त्वरित करा ; एमआयएमचे पदाधिकारी भेटले पालिका आयुक्तांना

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसरा चौक ते अमन चौक या लोकमान्य नगरला जोडणारा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, यासह शहरातील सर्व खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करत एमआयएमने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. सततच्या पावसाने शहर आणि परिसरामध्ये विशेष करून हद्दवाढ भागातील रस्ते खराब होत आहेत. यामुळे सर्वसामान्य व वाहनचालक यांना त्रास होत आहे. वारंवार सांगून महापालिका प्रशासनाकडून हद्दवाढ भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही. आसरा चौक ते अमन चौक लोकमान्य नगरला जोडणारा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. रस्ता नाही केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी रेश्मा मुल्ला, वसीम शेख, इस्सामोद्दीन पीरजादे, आशपाक बागवान, सोहेल चौधरी, शकील शेख, हाजी शेख, खलील टंगसाल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...