आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानीची माहिती घेण्याचे आदेश:अतिवृष्टीग्रस्त भागांचे पंचनामे करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलैपाठाेपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी जिल्ह्यात तीन मंडळामध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.चार मंडळामध्ये ४० मि.मी. हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव तर बार्शी शहरात पावसाने घरांची पडझड झाली आहे. महसूल प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्याठिकाणी नुकसान झाले आहे त्याचे तातडीने
पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...