आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प:माळशिरस; मुलींना १२५ सायकली दिल्या, ३ हजार सायकली देणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सायकल बँकेस माळशिरस तालुक्याने १२५ सायकली भेट दिल्या आहेत. याकामी नेवरे येथील सरपंच सविता पाटील व त्यांचे पती सुरेश पाटील यांची मोलाची मदत झाली आहे. सरपंच पदाचे पाच वर्षाचे मानधन सायकली घेण्यासाठी दिले आहे. भविष्यात माळशिरसमधील डॉटर्स मॉम संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी ३ हजार ९०० सायकली देण्याचा संकल्प याप्रसंगी केला आहे.

जिल्हा परिषद व शिक्षण विभागाच्या वतीने शालेय सायकल बँक ही संकल्पना माळशिरस तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नेवरे येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी सायकल देण्याचा कार्यक्रम आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. डॉटर्स मॉम संस्थेच्या शीतलदेवी मोहिते पाटील, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिवतेजसिंह मोहिते पाटील, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, सुरेश पाटील, प्रतापराव पाटील, संग्राम दळवी उपस्थित होते.

सरपंचपदाच्या मानधनातून विद्यार्थ्यांसाठी सायकली
राजकारणात खुर्चीचा मोहामुळे अनेकजण काम न करता फक्त खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु नेवरे येथील सुरेश पाटील व त्यांच्या पत्नी व सरपंच सविता पाटील यांनी मागील पाच वर्षातील सरपंच पदाचे मानधनातून १ लाख ८० हजार रुपयातून विद्यार्थ्यांसाठी सायकली दिल्या आहेत. त्यांच्या औदार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यावेळी हे पाहून गावातील नागरिकांनी या सायकल बँकस मदत केली. याकामी संग्राम दळवी यांची मेहनत कामी आली आहे.

शहरी नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक मनाने खूप मोठे असल्याचे या माध्यमातून दिसून आले आहे. नेवरेसारख्या गावात १२५ सायकलची बँक एकाच वेळी सुरू झाल्याने त्यांना सहकार्य करणारे सर्व नागरिक कौतुकास पात्र आहेत. आम्ही डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील तीन हजार नऊशे मुलींना पुढील वर्षभरात सायकल बँकेच्या माध्यमातून सायकली देण्याचे ध्येय ठेवले .’’ शीतलदेवी मोहिते पाटील, अध्यक्ष डॉटर्स मॉम फाउंडेशन

बातम्या आणखी आहेत...