आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाळशिरस तालुक्यात मेफेंथ्रीमाईन व टेरीमाईन नावाचे ७ हजार ४०४ उत्तेजक इंजेक्शनची डॉक्टरांच्या चिट्ठीविना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात ४ मेडिकल दुकानांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. व्यायाम करणारे तरुण व पैलवान या इंजेक्शनच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील यांनी औषध निरीक्षकांकडे १९ नोव्हेंबरला लेखी तक्रार केली होती.
अकलूज येथील दीपक मेडिकल स्टोअर्सचे मालक दीपक फडे यांच्यासह श्रीपूर येथील ओम साई मेडिकल, वेळापूरचे राजलक्ष्मी मेडिकल, प्रेमल मेडिकलवर गुन्हा दाखल झाला. अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथील दीपक मेडिकल अँड जनरल स्टोअर्सची ५ डिसेंबर रोजी तपासणी झाली होती. त्यात दीपक मेडिकल स्टोअर्सने विविध होलसेल औषध विक्रेत्यांकडून ८ हजार ९१५ इंजेक्शन पैकी केवळ १ हजर ५११ इंजेक्शन बिल बनवून विकली आहेत. उर्वरित ७ हजार ४०४ इंजेक्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व बिल विकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.