आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजे आणि इतर गोष्टींना फाटा:ताता गणपती मंडळ पंढरपुराहून मिरवणुकीसाठी बोलवणार 150 वारकऱ्यांचे पथक

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व विभागातील प्रसिद्ध ताता गणपती मंडळ यांना आपल्या मिरवणुकीच्या समारोपाला आगळावेगळा मात्र पारंपारिक कलाप्रकार सादर करणार आहे. पूर्वी विभाग मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीत आपली वेगळी ओळख असणाऱ्या या गणपती मंडळाकडून यंदाच्या वर्षी खास पंढरपूरवरून दीडशे वारकरी असलेल्या टाळ मृदुंग पथकाचा समावेश करण्यात येणार आहे डीजे आणि इतर गोष्टींना फाटा देत हे मंडळ पुन्हा एकदा पारंपारिक आणि कलात्मक गोष्टीकडे वळणार असल्याची माहिती या मंडळाचे प्रमुख विश्वस्त उमेश मामडयाल यांनी दिली आहे.

या मंडळाच्या वतीने आजवर अनेक विधाय कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते मात्र मिरवणुकीच्या वेळेला डौलात सादरीकरण करत या मंडळांनी आजवर आपला वेगळा पायंडा रचला आहे. मात्र यंदाच्या वर्षी वेगळा विचार म्हणून या मंडळांनी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वैष्णवांच्या पताका आणि भक्ती संप्रदायाचा वारसा पुढे नेण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या जोगदंड वारकरी संघ या पंढरपूरच्या संघाला पाचरण केले आहे. या 10 मृदंगधारी 10 विणाधारी आणि विसर्जन टाळकरी असे स्वरूप असणार आहे. पांढरे वस्त्र अन टाळ मृदुगाच्या तालावर ही मंडळी पूर्व विभाग ते सिद्धेश्वर मंदिर तलाव इथपर्यंत आपल्या मृदुग टाळाचा गजर घुमविणार आहेत. याचे नियोजन १५ दिवस अगोदर करण्यात आले असून अतिशय नियोजनबद्ध अशा पद्धतीने या कलापथकाचे सादरीकरण होणार असून याकरिता पन्नास हुन अधिक कार्यकर्ते नियोजनात समाविष्ट आहेत.

ही परंपरा जपणार

ताता गणपती मंडळ पूर्व विभाग प्रमुख विश्वस्त​​​​​​​ उमेश मामड्याला म्हणाले की, टाळ मृदंगाचा नाद म्हणजे आपल्या अनेक शतकापासून सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी आणि मिरवणुकीत आपले वेगळेपण राखण्यासाठी आम्ही हा नवीन प्रयोग करीत आहोत. याकरिता गेले महिनाभर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि संघाच्या संपर्कात आहोत विसर्जन मिरवणूक ही परंपरा अनोखा भक्तीरंग दाखवेल यात कोणतीही शँका नाही.

बातम्या आणखी आहेत...