आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड हरिनाम सप्ताह:मंगलमय वातावरण, टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रंथ दिंडी; महिलांचा सहभाग

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगलमय वातावरण, डोक्यावर ज्ञानेश्वरी, माथ्यावर गंध, खांद्यावर भगव्या पताका, सनई चौघड्यांचा नाद, टाळ-मृदंगाच्या गजरात आवंती नगर, शिवाजी चौक, निराळेवस्ती, आवंती नगर परिसरातून ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराजांचा जयघोष करीत ग्रंथ दिंडी निघाली. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यात सुमारे हजार भक्तांचा सहभाग होता. संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे अायोजन करण्यात आले होते.

आवंती नगर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, पारायण, भारुड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उत्तरार्ध सुरू असून, मंगळवारी सायंकाळी ग्रंथ दिंडी निघाली. यात अग्रभागी विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात दोन बालके होती. सनई चौघडा, बॅण्ड पथक, टाळकरी होते. डाेक्यावर तुळस आणि ग्रंथ घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. बग्गीत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा होती. वसंत विहार, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निराळे वस्तीमार्गे आवंती नगर येथे दिंडीचा समारोप झाला. आळंदीचे विष्णू महाराज केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी सोहळा पार पडला. मिरवणूक मार्गावर सेवेकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केली होती.

यावेळी माजी नगरसेविका अंबिका पाटील, राजकुमार पाटील, संजय पवार, पांडुरंग घाटे महाराज, सुनंदा घाटे, माऊली जाधव, किरण पवार, लहू गायकवाड, संजय साळुंखे, अनिता जाधव, सुनीता पाटील, मंदोदरी खंडाळकर, छाया खंडाळकरसह भाविक उपस्थित होते. सप्ताहाचा समारोप बुधवारी दुपारी करण्यात येणार आहे.

परगावहून आले भक्त
ग्रंथ दिंडीसाठी शहर परिसरातील गावातून भक्त आले होते. त्यांच्यासाठी सोय करण्यात आली होती. यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

बातम्या आणखी आहेत...