आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी सुरू होताच तांत्रिक मुद्द्यांवर भल्या भल्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत कासेगाव आणि सरकोली गटाची छाननी सुरू होती. दिवसभरात ४ गटांची छाननी झाली असून अनेक बड्या नेत्यांचे अर्ज अवैध ठरले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून ९ जून अखेर मुदतीत ४०५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी या अर्जांची छाननी येथील प्रांत कार्यालयात सुरू झाली आहे. यावेळी मागील 5 वर्षातील किमान ३ वर्षे ज्यांचा ऊस कारखान्यास गाळपास आलेला नाही त्यांचे अर्ज अवैध ठरवले आहेत.
शुक्रवारी दिवभरात भाळवणी, करकंब, मेंढापुर, तुंगत या चार गटांची छाननी पूर्ण झाली आहे. तर कासेगाव आणि सरकोली गटाची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बहुतांश उमेदवारांचा ऊस मागील ५ पैकी ३ वर्षे गाळपास गेलेला नाही. तर काहींच्या अर्जवर इतर कारणाने हरकती घेण्यात आल्या आहेत. विद्यमान संचालक समाधान काळे, शांतीनाथ बागल, बाळासाहेब पाटील, हणमंत शंकर नागटिळक, विठ्ठल कालिदास पाटील, बाळासाहेब पाटील, नीलेश हरिभाऊ काळे, सुंदर मधुकर बागल, सुरेश देठे, मोहन नागटिळक, तुकाराम निवृत्ती गाजरे, रवींद्र सिद्धनाथ बागल, राहुल दामोदर पवार, मोहन हळनवर, देवानंद गुंड यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. तर कृषिराज शुगरचे पद असल्याने गणेश पाटील यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली आहे.
याशिवाय दशरथ भगवान चव्हाण, रघुनाथ दगडू पिसे, शंकर बलभीम चव्हाण, मोहन तळेकर, औदुंबर भगवान तळेकर, सर्जेराव शेळके, दादा देशमुख, हणमंत खांडेकर, दिलीप पाटील, सुभाष गंगाराम होळकर,.राजाराम आत्माराम पाटील, प्रवीण गोडसे, विक्रम कोळेकर, दत्तात्रय रणदिवे,।दिनेश रणदिवे, मच्छिंद्र सपाटे, ॲड. दिनकर पाटील, अशोक जाधव, अंकुश लामकाने, वैभव डोळे, कल्याणराव गायकवाड, विलास चव्हाण तसेच , नागेश भोसले यांचाही तूंगत गटातील अर्ज नामंजूर झाला.
मेंढापुर गटातून महादेवी दीपक शिंदे, नाना कवडे, धनंजय देशमुख, रामदास चव्हाण, औदुंबर भोसले, संजय चव्हाण, व्यंकट भालके अवैध, शशिकांत शिरगिरे, विष्णू बागल, तानाजी बागल, नागेश भोसले, विक्रम कोळेकर, शालीवाहन कोळेकर नाना कवडे, सुधीर अभंगराव, संभाजी पाटील, तावशी, रामदास रोंगे, परमेश्वर देठे आदीचे अर्ज अवैध ठरले आहेत. रात्री उशिरा गणेश पाटील, समाधान काळे अशाच्या अर्जवर उमेदवारांच्या वकिलांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि त्यावर चर्चा सुरू होती..युवा उद्योजक अभिजित पाटील, समाधान काळे, व्यंकट भालके, विष्णू बागल यांचे अर्ज छनणीत अवैध ठरले आहेत. यामध्ये बहुतांश उमेदवार अभिजित पाटील गटाचे आहेत. भालके यांचेही ही अर्ज उडाले आहेत. रात्री उशिरा अभिजीत पाटील, गणेश पाटील व्यंकट भालके यांच्या अर्ज अवैध ठरविण्यास आक्षेप घेतला गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.