आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची वाईटाहून वाईट अवस्था:अनेक रस्त्यांची वाईटाहून वाईट स्थिती; अधिकारी अद्यापही दिवाळी मूडमध्येच

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभारवेस ते जोडभावी पेठ, मार्केट यार्ड ते शांती चौक, अशोक चौक ते गुरुनानक चौक, सात रस्ता ते महावीर चौक, जंगदबा चौक ते बेडर पूल यासह शहरातील अनेक रस्त्यांची वाईटाहून वाईट अवस्था झाली आहे. गणपती उत्सवपासून सुरू नागरिकांची ओरड सुरू आहे.

आता दिवाळी संपली तरी महापालिका प्रशासन ढिम्म आहे. डांबर तुटवटा आणि मक्तेदारांच्या मशिनरी बंद असल्याची कारण सांगत रस्ते कामास विलंब करण्यात येत आहे. नागरिकांचे कमरेचे लचके तुटले जात असताना प्रशासन अद्यापही दिवाळीच्याच मूडमध्ये असल्याचे दिसत आहे.

निवडक भागात २५ कोटींचे रस्ते, अन्य रस्त्यांची अवस्था दयनीय :
महापालिका भांडवली निधीतून २५ कोटींचे १६ रस्ते करण्यात येत आहेत. हे रस्ते या महिन्यात होतील, पण अन्य रस्त्यांचे काय, याबाबत महापालिका प्रशासन काहीच बोलायला तयार नाही. कुंभार वेस ते जोडभावी पेठ हा रस्ता स्मार्ट सिटीतून मधोमध खोदला, पण पुढे रस्ता केलाच नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्यासाठी काहीही तरतूद नाही. जुना बोरामणी नाका परिसरासह अनेक अंतर्गत रस्त्यांची स्थिती खराबच आहे.

केलेल्या रस्त्यांचा दर्जा तपासा शहरात आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते केले. रस्ते करताना दर्जा तपासणी केली जात नाही. डांबरी रस्ता करताना वरील सिलकोट केला नाही. त्यामुळे तीनच महिन्यांपूर्वी केलेले जुळे सोलापुरातील रस्ते वाहून गेले. शहरातील अनेक रस्त्यांची अशीच अवस्था आहे. कोट्यवधी खर्च होताहेत पण या रस्त्यांची दर्जा तपासणी होताना दिसत नाही.

हाॅट मिक्सचे प्लान्ट आहेत बंद
मक्तेदारांचे हाॅट मिक्सचे प्लान्ट बंद आहेत, ते सुरू होताच शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील. मक्तेदारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.''-पी. शिवशंकर, पालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...