आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघटनात्मक 50 % च्या आतील ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत ‘मराठा वनवास यात्रा’ करण्यात येणार आहे.
सहा मे रोजी तुळजापूरपासून यात्रेला प्रारंभ होईल आणि सहा जून रोजी मुंबई मंत्रालयापर्यंत ही यात्रा पोहाेचणार आहे. मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती गुुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पायी यात्रा असून, याच दिवशी आझाद मैदानावर श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.
लेखी आश्वासने फार झाली. आता प्रत्यक्ष आरक्षणा दिल्याशिवाय माघार नाही. या यात्रेत सुमारे २५० समाजबांधव सहभागी होतील. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटे ५ ते सकाळी १०, सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत मार्गक्रमण केले जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विश्रांतीची वेळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी योगेश केदार, प्रतापसिंह कांचन पाटील, सुनील नागणे आदी उपस्थित होते.
ही यात्रा तुळजापूर, सांगवी, तामलवाडी, सोलापूर, कोंडी, लांबोटी, यावली, शेटफळ, वरवड, टेंभुर्णी, सरडेवाडी, गलांडवाडी नंबर १, पळसदेव, भीमगवण, राबणगाव, पाटस, भांडगाव, म्हेत्रे वस्ती, लोणी काळभोर, वाणवडी, लाल महल, शिवाजी नगर, चिंचवड, सोमाटणे फाटा, कामशेत, लोणावळा, महड फाटा, रायती वाणखळ, देरावली, खारघर, वाशी, चेंबूर, दादर, भायखळा, मुंबई असा यात्रेचा मार्ग आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.