आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये मॅरेथॉन:8 जानेवारीरोजी आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहन

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर रनर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित सोलापूर मॅरेथॉनमध्ये सोलापूरकरांनी मोठया संख्येने नाव नोंदवून सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्वत: नाव नोंदवून नोंदणीचा शुभारंभ केला.रविवारी 8 जानेवारीरोजी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

शरीरासाठी व्यायामाची गरज असते आणि चालणे, पळणे यातून शरीराला चांगला व्यायाम होतो या हेतुने सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या मुक्ती नंतर होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी शुभारंभ करण्यात आला आहे.

रविवारी पळण्याचा सराव

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मॅरेथॉनचे शानदार आयोजन करण्यात येणार असून कोरोनाच्या महामारीनंतर आयोजित करण्यात येत असलेल्या सोलापूर मॅरेथॉनबाबत मोठा उत्साह असणार आहे. या मॅरेथॉनची तयारी चांगल्या पध्दतीने करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर रविवारी मॅरेथॉनची तयारी म्हणून पळण्याचा सराव होणार आहे. तसेच विविध उपक्रमांचे आयोजन मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले.

सोलापूर शहर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील शहरातील नागरीक, तरूण, धावपटू यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.solapurmarathon.com या बेबसाईटवरून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन सोलापूर रनर्सचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया यांनी केले. यावेळी रनर्स असोसिएशनचे सचिव डॉ. विश्वास बिराजदार, रेस डिरे्नटर डॉ. विक्रम दबडे, खजिनदार डॉ. योगेश जडे, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. नितीन बलदवा,डॉ. किरण किणीकर, डॉ. यशवंत पेठकर, डॉ. प्रदीप भोई, ओंकार दाते, श्रीनिवास संगा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...