आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळासाठी सोमवारी मोर्चा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने बोरामणी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमानतळावरून तूर्त एका बाजूने विमानसेवा सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. १९) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सिद्धेश्वर साखर कारखाना ते होम मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने मोर्चा निघणार आहे.

माेर्चा हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, सात रस्ता, रंगभवन मार्गे तो होम मैदानावर पोहोचेल. तथे सभा होईल. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन धर्मराज काडादी, भाकपचे रा. गाे. म्हेत्रस, शेतकरी संघटनेचे अख्तरताज पाटील, शिवानंद दरेकर, अमोल हिप्परगी, बोरामणी विमानतळ कृती समितीचे प्रा. राजू चव्हाण, सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे दिनेश शिंदे, गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...