आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाच्या वेदनांवर 'मरहम':अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने काव्यसंग्रहाचे प्रकाशन

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला वेदना असतात. त्या वेदनांवर उपचार करणे गरजेचे आहे. वेदनेवर उपचार करण्याचे काम साहित्य करत असते. प्रत्येकाच्या वेदनांवर उपचार करण्याचे काम 'मरहम' करेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी केले.

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. इ.जा तांबोळी लिखित मरहम या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा डॉ. अजीज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

साहित्य क्रांती घडवतात

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख हे बोलत होते. ते पुढे म्हणाले, साहित्यातून फक्त संवेदना मांडून उपयोग नाही. तर त्यावर उपाय दाखवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. लोक येतील जातील पण त्यांचे विचार साहित्यातून जिवंत राहतील. साहित्य क्रांती घडवतात. त्याच्याकडे विरंगुळा म्हणून पाहू नका. प्रत्येकाने जोडायची निती ठेवावी, तोडायची नसावी. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करू.

113 वर्षानंतर नोबल नाही

कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानावरून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अजीज नदाफ म्हणाले, इबाडत की तरह मै हर काम करता हु, मी सबको सलाम करता हू असे शेर सादर करत त्यांनी साहित्याचे महत्व विषद केले. कवी ने या काव्य संग्रहाच्या माध्यमातून समाजाला मलमपट्टी केली आहे. 113 वर्षानंतर एकाही कवीला नोबल पुरस्कार मिळाला नाही, याची खंत नदाफ यांनी व्यक्त केली.

चित्रकार मुहाफीज़ इकबाल यांचा सत्कार

यावेळी व्यासपीाठावर प्रा. डॉ. हाशम बेग मिर्झा, मराठी पत्रकार संघाचे सचिव प्रा.पी.पी. कुलकर्णी, सह सचिव अबुबकर नल्लामंदू , नूर सोशल वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी, जनसेवा शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेबूब तांबोळी, पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी 'मरहम' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर मिर्जा हाषम बेग , डॉ. शकील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मरहम चा मुखपृष्टचे चित्रकार मुहाफीज़ इकबाल यांचा सत्कार करण्यात आला.

कुरान पठन मजहर अल्लोळीनी केले. प्रस्ताविक सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा स्वागत डॉ. शकील शेख , हसीब नदाफ यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. सुरयया परवीन जहागीरदार यांनी केले तर आभार मुबारक शेख यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...