आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू-वर परिचय:मार्कंडेय फाउंडेशनचा 25 रोजी‎ ऑनलाइन वधू-वर परिचय मेळा‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या‎ पद्मशाली सप्तपदीतर्फे पद्मशाली‎ समाजातील उपवर वधू-वरांसाठी‎ रविवार, दि. २५ डिसेंबर रोजी‎ आॅनलाइन परिचय महामेळाव्याचे‎ आयाेजन केले आहे. पद्मशाली‎ समाजातील वधू-वरांना योग्य‎ जोडीदार मिळावा आणि पुढील‎ आयुष्य चांगले व्यतीत करता यावे‎ या उद्देशाने आयोजन केल्याची‎ माहिती फाउंडेशनचे संस्थापक‎ गौरीशंकर कोंडा यांनी दिली.‎

हा मेळावा समाज माध्यमावर‎ रविवारी सकाळी १० ते २ आणि‎ सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होईल.‎ घरबसल्या उपवर वधू-वरांनी‎ सहभागी होऊन स्वतःची व‎ कौटुंबिक माहिती द्यायची आहे.‎ प्रत्येकी दोन मिनिटे वेळ देण्यात‎ येणार आहे. ज्यांनी परिचयपत्र‎ पाठवले आहे, अशांनाच परिचय‎ देता येणार आहे. पद्मशाली‎ समाजातील युवक-युवतींनी मोठ्या‎ संख्येने सहभागी व्हावे, असे‎ आवाहन गणेश पेनगोंडा यांनी केले.‎ ९१७५९८८९४० वर संपर्क साधावा.‎

बातम्या आणखी आहेत...