आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह:जुळ्या बहिणींशी लग्न, अदखलपात्र गुन्हा दाखल

अकलूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज (माळेवाडी) येथे शुक्रवारी (दि. २) एका युवकाने जुळ्या बहिणींबरोबर विवाह केला. या संदर्भात त्या युवकावर अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राहुल फुले यांच्या तक्रार दिली आहे.अंधेरीच्या युवकाने कांदिवली येथील दोघींसोबत एकाच वेळी माळेवाडी येथील हॉटेलमध्ये विवाह केला होता. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी अकलूज ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नवरा मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

संगनमताने विवाह केला आहे. त्या दोघीही उच्चशिक्षित असून, आयटी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांची यासंदर्भात कसलीही तक्रार नाही. पहिली बायको असताना तिच्या संमतीविना दुसरे लग्न केल्यास कारवाई होते. परंतु येथे या दोन्ही बहिणींची संमती असल्याचे सांगण्यात आले. राहुल फुले यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, असे अकलूजचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...