आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकप महापालिकेवर काढणार आक्रोश मोर्चा:सोलापूरात सार्वजनिक नळांवर घातली बंदी, अतिक्रमण दंडही वाढवला

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने पाच टक्के वाढीव घरपट्टी करण्यात आली आहे. तर शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण दंडही वाढविण्यात आला आहे. यासह विविध मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने येत्या 24 ऑगस्ट रोजी महापालिकेवर दुपारी तीन वाजता मोर्चा काढणार असल्याचे आक्रोश आंदोलन करणार असल्याचे पक्षाचे नेते नरसिया आडम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरात नागरिकांना अत्यावश्यक नागरी सेवा पुरविणारी महानगरपालिका ही शिखर संस्था म्हणून कार्यरत असणारी प्रशासकीय यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमार्फत शहरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांच्या उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. वास्तविक नागरिकांना प्रदूषण मुक्त पर्यावरण, स्वच्छ पाणी, सकस आहार, स्वास्थ्य हे संविधानिक अधिकार आहेत. हे नागरिकांचे अधिकार शाबूत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

पाण्यासाठी संघर्षाची वेळ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या शहराचा इतिहास जगाच्या पाठीवर अजरामर आहे. याची जाणीव व जागृती जतन करणे गरजेचे आहे. भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्य उपभोगल्याचा सन्मान मिळालेल्या शहरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येत असल्याची खंतही आडम यांनी व्यक्त केली.

आर्थिक स्थिती चिंताजनक

सोलापूर शहरात 159 अधिकृत तर 61 अनाधिकृत असे 220 झोपडपट्ट्या आहेत. 220 झोपडपट्ट्यांमध्ये 60 हजार झोपड्या असून यांची लोकसंख्या 3 लाखाच्या पुढे आहे. यामध्ये अंदाजे 1500 सार्वजनिक नळ आहेत. या झोपडपट्टीधारकांकडून कर आकारणी केली जाते. यामध्ये सार्वजनिक नळ पाणीपट्टी कराचा समावेश असतो. या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती हि अत्यंत चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर दंडाची रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माकपचे जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख, सुनंदा बल्ला फातिमा शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...