आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र साहित्य परिषद:जुळे सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी पद्माकर कुलकर्णी, सायली जोशी यांची कार्याध्यक्षपदी निवड

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी पद्माकर कुलकर्णी यांची तर कार्याध्यक्षपदी सायली जोशी यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर पानगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शाखेच्या नुतन कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये 2022 ते 2027 या पाच वर्षासाठी पदाधिकारी निवडण्यात आले. श्रीकांत कुलकर्णी (उपाध्यक्ष) गिरीश दुनाखे (प्रमुख कार्यवाह) रामचंद्र धर्मसाले (सह कार्यवाह) आनंद देशपांडे (कोषाध्यक्ष), संदीप कुलकर्णी (कार्यक्रम प्रमुख), सचिन चौधरी (युवा प्रमुख), रोहिणी कुलकर्णी (महिला विभाग प्रमुख) आणि संतोष पवार (प्रसिद्धी प्रमख) यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर पानगावकर यांनी शाखेच्या पंधरा कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये नव्या पदाधिकाऱ्यां शिवाय कार्यकारिणीत अचला राचर्ला, यशवंत बिराजदार, डॉ. माधुरी भोसले, नयना देशपांडे, प्रशांत जोशी यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून प्रा.ए.डी.जोशी,डॉ. माधवी रायते यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर पानगावकर यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...