आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बनावट नोटा तयार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून साहित्य; 10 नोटा चलनामध्ये आणल्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट नोटा तयार करण्यासाठी उरळी देवाची (पुणे) येथून प्रिंटर मशीन व साहित्य आणल्याची माहिती समोर आली आहे. ५०० दराच्या दहा नोटा त्यांनी चलनात आणले आहेत. कुर्डूवाडी परिसरातील टेंभुर्णी चौकात तीन डिसेंबर रोजी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या चौघांना पकडले होते. हर्षल शिवाजी लोकरे (वय २०, कंदर, करमाळा), सुभाष दिगंबर काळे (३६, भोसरे, माढा), प्रभाकर उर्फ गणेश सदाशिव शिंदे (३८, शाहूनगर भोसरे, माढा), पप्पू भारत पवार (वय ३०, अर्जुननगर,‌ करमाळा) या चौघांना अटक आहे.

हर्षलकडून पाचशे रुपयांच्या ४९३ नोटा, सुभाषकडून ५८० नोटा, प्रभाकरकडून १०० नोटा जप्त आहेत. नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्यही ताब्यात घेतले आहे. पप्पू हा संगणक तज्ञ आहे. फोटोशॉप सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा तयार करण्याचे काम तो करत होता. यातील काहीजण पदवीधर आणि काही बेरोजगार आहेत.

चौघांना १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी आहे. तीन डिसेंबर रोजी चौघे टेंभुर्णी चौकात येणार अशी माहिती मिळाल्याने सापळा रचून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे दहा नोटा चलनात आणल्याची प्राथमिक माहिती आहे. आणखी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...