आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहीम:शहरात 15 नागरी आरोग्य केंद्रांवरगोवर प्रतिबंधक लसीकरण सुरू

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका आरोग्य विभागाने शहरातील १५ आरोग्य केंद्रांवर गोवर प्रतिबंधक लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात दाराशा नागरी आरोग्य केंद्र येथे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते झाली. पहिल्या दिवशी एकूण २६ सत्रे आयोजित केली होती. त्यामध्ये एमआर एकची ११२ जणांना तर एमआर दोनची १०२ जणांना लस दिली. जीवनसत्व अ ची मात्राही देण्यात आली.

ऊसतोड कामगार, बांधकामावरील कामगारांची बालके, स्थलांतरित कुटुंबांतील बालके, वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांसाठी ही मोहीम राबवली जात आहे. ९ ते १२ महिने या वयोगटांत पहिली तर १६ ते २४ महिने या वयोगटात दुसरी मात्रा दिली जाते. यापैकी एखादी मात्रा राहिली असेल तर पालकांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे. गोवर प्रतिबंधक लसीकरणाची पहिली फेरी २५ डिसेंबरपर्यंत तर दुसरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी या दरम्यान हाेईल.

बातम्या आणखी आहेत...