आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनामुळे निवासी डाॅक्टरांचा संप मागे:दिड महिन्यात प्रलंबित मागण्या पूर्ण होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन, नियमित कामकाज, सेवा सुरु

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासह व सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी संप पुकारला होता. संपाच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सेंट्रल मार्डच्या पदाधिकारी यांच्या सोबत मुंबईत बैठक घेतली. त्या बैठकीत सर्व मागण्या रास्त आहेत. तरी त्या मागण्या दिड महिन्यात सोडवण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी मंगळवारी संप माघार घेत दैनंदिन कामास व रुग्णास सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना, मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यामध्ये राज्यभरातील ४ ते ५ हजार डॉक्टर सहभागी झाले होते.सिव्हिलमधील २१० डॉक्टर सहभागी झाले होते. मात्र प्रत्यक्षात निवासी डॉक्टरांनी रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ सेवा देऊ केली.

काय झाले बैठकीत?

  • वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृह दुरुस्तीसह, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मिती,सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरण्यात येतील.
  • १६ ऑक्टोबर २०१८ प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ आदा करण्यात येइल.
  • वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करुन सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करुन राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत वरिष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय दिला जाईल.

तुमच्या मागण्या रास्त

तुमच्या मागण्या रास्त आहेत, सकारात्मक निर्णय नक्की घेतोय, यासाठी दिड ते दोन महिन्यात निपटारा करतो हे अश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मिटवला आहे. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हैसेकर, सचिव देशपांडे, मार्डचे पदाधिकारी विकास कटारे, अविनाश दहिफळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...