आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:वाॅटर आॅडिट रिपोर्टवर आज आयुक्त कार्यालयात बैठक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाण्याचे आॅडिट करण्यात आले असून, ४२ टक्के पाणी गळती असल्याचा अहवाल नुकताच वेबकॅस कंपनीने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार पालिका आयुक्त पी. शिवशंकर बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यात पाण्याच्या आॅडिटमध्ये सुचवलेले उपाय आणि अंमलबजावणीबाबत चर्चा करणार आहेत. पालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी वाॅटर आॅडिटसाठी प्रयत्न केले असून, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यानुसार आॅडिट केले.

शहरातील पाणीपुरवठा सुधारणा होण्यासाठी वाॅटर आॅडिट होणे आवश्यक होते. त्यानुसार केले. यापूर्वी फ्लो मीटर लावून पाण्याची मोजणी केली. त्यानुसार सविस्तर अहवाल आवश्यक असल्याने आॅडिट केले. गळती थांबवणे आणि इतर कारणावर काम करण्यात येत आहे. शहरातील जुळे सोलापुरात काही दुरुस्ती करून शहरात तीन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले. उजनी तसेच टाकळी येथून शहराला पाणीपुरवठा होता. दोन्ही ठिकाणावरील पाणीगळतीवर चर्चा यावेळी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...