आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी दुहेरी योजना:सोलापूरच्या समांतर जलवाहिनीची फेरनिविदा निघणार, स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • Meeting of the Board of Directors of Smart City to decide on the re-tender of parallel waterways

सोलापूरसाठी समांतर जलवाहिनीची फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट सिटीचे चेअरमन असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक झाली.

निविदा पुन्हा का?

गुप्ता यांनी उजनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियमानुसार किमान तीन कंत्राटदार निविदा प्रक्रियेत सामील होणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पाच्या निविदेमध्ये दोन कंत्राटदार सामील झाल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्या त्रिस्तरीय समितीला निर्णय घेण्याचे अधिकारी दिले. एकात्मिक नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून याबाबतची निविदा मंजूर करण्याचा निर्णयही झाला आहे. याबाबतच्या दुरूस्त्या पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांनी 15 जूनपर्यंत कराव्यात, असे गुप्ता यांनी सांगितले.

प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

स्टेडिअममध्ये अंतर्गत सुधारणा करणे, खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था याबाबतचा एकत्रित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही गुप्ता यांनी दिल्या. यावेळी नूतन पोलिस आयुक्त हिरेमठ यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बैठकीला चेअरमन गुप्ता, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ऑनलाइन उपस्थित होते. नियोजन भवन येथे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, केंद्र सरकारचे प्रतिनिधी पी. सी. धसमाना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, शहर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...