आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:मतिमंद महिलेचा विनयभंग, तिघांना दीड वर्षाची सक्त मजुरी

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतिमंद, मूकबधिर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एस. ए. आर. औटी यांनी तिघा आराेपींना दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. हुसेन महिबूब मुजावर (वय २४), सैपन गैबिसाब आतार (वय २५), खाजा महिबूब मियान (वय २१) या तिघा आराेनींना शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाकडून आठ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी पोलिस उपायुक्त संतोष गायकवाड आणि ठाणे अमलदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अपंग व्यक्ती अधिकार कायदा १९१६ चे कायदे कलम ९२ ड खाली व विनयभंग केल्याप्रकरणी अनुक्रमे दीड वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा तसेच प्रत्येकी दोनशे रुपये दंड सुनावला. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, सरकारी वकील माधुरी देशपांडे, नागनाथ गुंडे यांनी काम पाहिले. पैरवीकार म्हणून दिनेश कोळी यांनी मदत केली.

बातम्या आणखी आहेत...