आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे मीटर:पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीघरोघरी नळांना मीटर : आयुक्त

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रती हजार लिटर पाण्यास घरगुती ११.५, वाणिज्य ३५, औद्योगिक ७० रुपये दर

शहरात चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी घरोघरी पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. घरगुती नळासाठी प्रती हजार लिटर पाण्यास ११.५० रुपये तर वाणिज्यसाठी ३५ तर उद्योगासाठी ७० रुपये दर असणार आहे. दर तीन महिन्यानी नागरिकांना बिले देण्यात येणार आहे. मीटरसाठी नागरिकांनी यापूर्वी पैसे भरले असेल तर ती रक्कम वजा होईल. अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

पाण्याचे दोन प्रकारचे मीटर कसे : शहरात सुमारे २.०८ मिळकत असून, यापैकी १.९२ लाख मिळकतीचे वाॅटर आॅडीट करण्यात आले. अन्य घराचे ऑडीट सुरु आहे. प्रत्येक घरास इलेक्ट्रीक व मेकॅनिक मीटर बसवण्यात येणार आहे. दर तीन महिन्यांनी मीटरचे बिल मोबाईलवर देण्यात येणार आहे. यासाठी मक्तेदार नियुक्ती करण्यात येईल.

विनापरवाना घरास दुप्पट कर, बांधकाम परवाना असेल तर दीडपट
विना परवाना आणि वाढीव बांधकाम केले असेल तर त्यांना पालिकेचे कर दुप्पट असेल, वापर परवाना नसेल तर दीडपट आकारणी असेल. अशा मिळकतीचे शोध घेण्यासाठी नगररचना, आरोग्य निरीक्षक आणि प्रोत्सासन बक्षिस योजना माध्यमाचा वापर केला जाणार आहे. मागील दहा दिवसात २३०० घरांचा शोध घेतला. मागील वर्षी सहा हजार घरे शोधले होते. या वर्षाच्या बिलात यांची अमंलबजावणी होणार आहे.

पाण्याचे दोन प्रकारचे मीटर कसे : शहरात सुमारे २.०८ मिळकत असून, यापैकी १.९२ लाख मिळकतीचे वाॅटर आॅडीट करण्यात आले. अन्य घराचे ऑडीट सुरु आहे. प्रत्येक घरास इलेक्ट्रीक व मेकॅनिक मीटर बसवण्यात येणार आहे. दर तीन महिन्यांनी मीटरचे बिल मोबाईलवर देण्यात येणार आहे. यासाठी मक्तेदार नियुक्ती करण्यात येईल. यावेळी बोलताना आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, प्रत्येक ठिकाणी फ्लो मीटर लावले आहे. मीटर आणि फ्लोमीटरचे पाणी यांच्या सहाय्याने तपासणी केल्यास बोगस नळ सापडतीलइलेक्ट्रिक वाहन असेल तर मिळकत करात २ ते ५ टक्के सूट : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन धोरण शासनाने जारी केले. त्यानुसार पालिका करात सुट देण्यात येणार आहे. घरात इलेक्ट्रीक वाहन व चार्जिग सुविधा असेल तर दोन टक्के सूट देण्यात येईल. सोसायटीत २० टक्के घरात इलेक्ट्रीक वाहन व चार्जिग सुविधा असेल तर १ टक्के तर ४० टक्के घरात वाहने असतील तर २ टक्के, ६० टक्के असतील तर ३ टक्के, ८० टक्के असतील तर ४ टक्के आणि १०० घरात असतील तर ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करावे. त्यानंतर महापालिका खात्री करेल आणि बिलात सुट देईल. ग्रीन बिलासाठी २५२७ जणांनी अर्ज केले असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...