आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा:माेठे बाप्पा निघाले परगावी मराठवाड्यात अधिक मागणी

साेलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना संसर्गाच्या काळात माेठ्या अाकारातील गणेशमूर्तींवर निर्बंध हाेते. यंदा ते हटवल्याने मूर्तिकारांमध्ये माेठा उत्साह दिसून येत आहे. आठ ते वीस फूट उंच मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात मूर्तिकार बांधव व्यस्त अाहेत. या मूर्तींना मराठवाड्यात अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील राजू गुंडला, धुळप्पा मंजुळे, दीपक वईटला, गणेश बडगू ही मंडळी माेठ्या मूर्ती बनवण्यात नाव मिळवले. त्यांच्याकडे मराठवाड्यासह कर्नाटकातूूनही भक्तमंडळी येतात. सहा महिन्यांपूर्वीच नाेंदणी करतात. मागणीनुसार या मूर्ती बनतात. कलबुर्गी, अाळंद, बंगळुरू, उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, लातुरात मागणी असते.

माेठ्या आकारातील साचे असल्याने छाेट्या बनवण्यात अडचणी हाेत्या. यंदा निर्बंध हटवल्याची घाेषणा झाल्यानंतर सर्व कारागिरांना बाेलावूून कामाला लावले. राेजगार मिळाला. उत्साहही संचारला. दीपक वईटला, मूर्तिकार

बातम्या आणखी आहेत...