आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर येथील रेल्वे स्टेशन येथे रुळावरुन जाणाऱ्या 4 परप्रांतीय मजूरांना रेल्वेने उडवल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मीटाकळी परिसरात घडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सर्व अपघातग्रस्त बिहार, छत्तीसगड राज्यातील बांधकाम साइटवर काम करणारे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्वजण लक्ष्मी टाकळी परिसरात राहत होते. रेल्वे ट्रॅकच्या शेजारी त्यांची वस्ती होती. एकूण सहाजण होते. त्यापैकी दोघेजण मरण पावले आहेत तर दोघेजण जखमी झाले आहेत. मृत, जख्मींची ओळख अजून पटलेली नाही.
रुळावर दारुच्या बाटल्या
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जख्मींना दाखल करण्यात आले आहे. नेमका अपघात कशामुळे झाला, कसा झाला किंवा ते सहा तरुण रेल्वे ट्रॅकवर कशामुळे आले होते या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आली नाहीत. मात्र रुळावर दारुच्या बाटल्या आढळून आल्याने मजूर दारु पीत बसले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंढरपूर लोहमार्ग पोलीस घटनास्थळी अधिक माहिती घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.