आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिभाव:जैन माणिकस्वामी महाराज मंदिरात दशलक्षण महापर्व ; 10 दिवस भाविकांना पूजेचा लाभ

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसार गल्लीतील ‘श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज’ मंदिरात दशलक्षण महापर्व मोठ्या भक्तिभावात पार पडला. या दशलक्षण महापर्वात ३०० हून अधिक महिलांनी व्रत केले होते. भाविक सुरेश व्हनकसे यांनी सलग दहा दिवसांचे उपवास केले तर ४ भाविकांनी रत्नत्रय उपवास केले. प्रातः काळी स्तोत्र साधना झाल्यानंतर अनेक भाविक जप माळ करीत होते. पंचामृत अभिषेक विधी, महाशांती मंत्र रोज करण्यात आले. षोडशकारण पूजा, पंचमेरू पूजन आणि दशलक्षण सामूहिक पूजेचा लाभ १० दिवस भाविकांनी घेतला. पौर्णिमेच्या दिवशी डॉ. रणजित गांधी, सौ. माया गांधी यांनी समस्त मंदिर समिती व गांधी परिवारातर्फे समाजाप्रती क्षमाभाव प्रकट केला. पालखीचे चढाव्यात भाविक चढाओढीने बोली लावत होते.

श्री महावीर शिरसाड परिवाराने कुंभाचा मान मिळविला. श्र. प्रवीण मेहता परिवाराने शास्त्र स्थापनेचा मान स्वीकारला. शासकीय रुग्णालयातील निवृत्त तज्ञ शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप छंचुरे यांनी अभिषेक व शांतीधारेचा मान घेतला. याप्रसंगी विक्रम गांधी, राजन गांधी, ब्रिजेश गांधी, देवेंद्र शटगार उपस्थित होते. श्री पराग शहा यांनी आभार मानले. डॉ. महावीर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मांगलिक विधी पार पडले.

बातम्या आणखी आहेत...