आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयएम कॅट:बहुपर्यायी प्रश्नांसाठी मायनस गुणांकन, विद्यार्थ्यांना संधी ; नोंदणीसाठी 14 सप्टेंबरपर्यंत मुदत

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासह इतर देशपातळीवरील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ‘कॅट’ (कॉमन अॅडमिशन टेस्ट) ही प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. त्याच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल. या परीक्षेशी संबंधित फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन (एफएक्यू) जारी करण्यात आले आहेत, जेणेकरून त्याचा अभ्यास करून उमेदवारांना परीक्षा पॅटर्नची माहिती होऊ शकेल. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांची (मल्टिपल चॉइस) उत्तरे चुकली तरच निगेटिव्ह मार्किंग केली जाईल. नॉन मल्टिपल चॉइस प्रश्नांची उत्तरे चुकली तर गुण कपात होणार नाही. परीक्षा केंद्रावर कॅल्क्युलेटर किंवा इतर गॅझेेट नेण्यास बंदी आहे. पण कॉम्प्युटर स्क्रीनवरील कॅलक्युलेटरचा वापर करण्याची मुभा परीक्षार्थीला देण्यात आली आहे.

विद्यार्थी मॉक टेस्टच्या माध्यमातून परीक्षा पॅटर्न, प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊ शकतात. योग्य उत्तरे देणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क, उत्तर चुकले तर वजा एक व प्रश्न न सोडवल्यास कोणतेही मार्क कापले जाणार नाहीत. ‘एफएक्यू’ चार प्रकारांत जारी केलेले आहेत. ऑनलाइन अर्ज करतानाच विद्यार्थी आपल्या परीक्षेसाठी वेळेचे स्लॉट व परीक्षा केंद्राचे शहर नोंदवू शकतात. दरवर्षी सुमारे २ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. आतापर्यंतचा पॅटर्ननुसार इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले.

बातम्या आणखी आहेत...