आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीकाठच्या गावांना आठ तास वीज पुरवठा करा:आमदार सुभाष देशमुख यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सध्या चार तास वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडथळे येत आहे. आता सध्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आठ तास पाणीपुरवठा करावा, अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह महावितरणच्या अधीक्षकांना दिल्या आहेत.

दक्षिण तालुक्यातील कुरघोट, टाकळी, औज, मंद्रूप कारकल या भीमा नदीकाठच्या गावांना सध्या चार तासात वीज पुरवठा होत आहे. सध्या नदीला नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. वीज पुरवठा कमी वेळ असल्यामुळे शेतकऱ्यांना नदीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत. सर्व पाणी कर्नाटकमध्ये जात आहे. तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे. वास्तविक पाहता नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर आठ तास वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, अद्याप या नदीकाठच्या गावांना चारच तास वीज पुरवठा आहे. याबाबत तेथील शेतकऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्याची तात्काळ दखल घेऊन आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासह महावितरणच्या अधीक्षकांना या गावांना आठ तास पाणीपुरवठा करावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळेल, अशा सूचना केल्या. लवकरात लवकर याची अंमलबजावणी करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

सोलापुरात भरपूर पाऊस झाला. उजनी धरण प्लसमध्ये आले. त्यानंतर शंभर टक्के भरले देखील. त्यामुळे दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. निरा आणि भीमा नदीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून जाणाऱ्या पाण्याचा उपसा होण्यासाठी वीज उपलब्ध नाही. त्यामुळे उभी पिके जळून जात आहेत. ऊसदेखील तोडणीला आलेला आहे. अशा परिस्थितीत केवळ विजेअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होईल. ते टाळण्यासाठी महावितरण विभागाने विशेष दक्षता घेऊन अधिक वीजपुरवठा करण्यासंबंधी सूचना कराव्यात, असे आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...