आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागात वाडी-वस्तीवर राहणाऱ्या अनेक विद्यार्थिनी दूरवर शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत असल्याने शाळा गळतीचे प्रमाण आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी सायकल बँक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अभिनव उपक्रमाचे कौतुक पंचायतराज समितीच्या सदस्यांनी केले. तसेच त्यांच्याकडून सायकल बँकेस १६ सायकली भेट दिल्या.
राज्याची पंचायतराज समिती बुधवारपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या दिवशी सकाळी शासकीय विश्रामगृहात स्थानिक आमदार यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रश्न, अडीअडचणी, सूचना याबाबत समितीने चर्चा केली.
आढावा बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष अध्यक्ष संजय रायमूलकर, इतर आमदार सदस्यांनी त्यांच्यातर्फे सायकल बँकेस सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना सायकल बँकेत त्या जमा करण्यासाठी भेट दिल्या. ग्रामीण भागातील गरीब मुली उच्च शिक्षीत झाल्या पाहिजेत. सायकली-विना त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, या सामाजिक जाणिवेतून सायकल बँकेला मदत करण्याचे ठरले.
या उपक्रमाला प्रोत्साहन दिले तर होतकरू मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे श्री. रायमूलकर यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार विक्रम काळे, कैलास पाटील, अनिल पाटील, सदाशिव खोत, महादेव जानकर, शेखर निकम, माधवराव पवार, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, विजय रहांगडाले, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.