आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती भागातील तडवळ भागातील नागरिकांनी मूलभूत गरजा पुरवण्यात महाराष्ट्र शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत ५ डिसेंबरला दुपारी चारच्या सुमाराला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटमध्ये संबंधित लोकांना बोलावून कर्नाटकात जाण्याचे निवेदन देऊ नये.
सीमावर्ती भागात मूलभूत गरजा पुरविण्यास शासन सक्षम आहे, असे आश्वासीत केले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी तडवळ परिसरातील ११ गावच्या लोकानी मूलभूत गरजा पुरवा अन्यथा आम्हाला कर्नाटकास सूपूर्द करा, असा ठराव जिल्हाधीकारी कार्यलयात दिले. तडवळच्या आळगे, शावाळ, धारसंग, कलकर्जाळ, कोर्सेगाव, केगाव बुद्रुक, देवीकवठे यासह इतर गावांचा यात समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.