आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नेते अमित ठाकरेंची विद्यार्थ्यांशी बंद दाराआड चर्चा:मनसे पदाधिकाऱ्यांनादेखील आत प्रवेश दिला नाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी सात रस्ता येथील विश्रामगृहात बंद दाराआड विविध महाविद्यालयांतील निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी पदाधिकाऱ्यांनाही आत प्रवेश दिला नाही. पत्रकारांना केवळ छायाचित्र काढण्यासाठी प्रवेश दिला. त्यानंतर संपूर्ण संवाद बंद दाराआडच झाला.

उपस्थित विद्यार्थ्यांशी संवादामध्ये शैक्षणिक अडचणी, समस्या यावर मंथन झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात मनसे विद्यार्थी शाखा स्थापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी काय, या जाणून घेतल्या गेल्या. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अमित ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांचे ३० फुटांचा १३० किलो वजनाचा मोठा हार क्रेनद्वारे घालून मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...