आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रुग्णालयाजवळ रिक्षामध्ये झोपल्यानंतर नागेश आंटद (रा. एकतानगर) यांच्या खिशातून २२ हजार ५०० रुपये चोरांनी काढून घेतले. झोपेतून जागे झाल्यानंतर हा प्रकार समजला. १७ जून रोजी जेल रोड पोलिसात यांनी फिर्याद दिली आहे. आंटद हे रिक्षात झोपले होते. त्यांच्या खिशातून पैसे काढून घेण्यात आले आहेत.
दोन बोकड चोरीला सूर्यवंशी मटन स्टॉल दुकानातून एक बोकड व एक पाट चोरीला गेले आहे. आनंद पन्हाळकर (वास्तूविहार जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात दोन बोकड चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. आनंद यांचे मटन विक्रीचे दुकान आहे. १७ जून रोजी रात्री त्यांनी दुकान बंद करून गेले. दुकानात दोन बोकड त्यांनी बांधले होते. त्या दरम्यान चोरांनी शटर उचकटून दोन्ही बोकड चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विजापूर नाका पोलिस तपास करत आहेत. विकासनगरमध्ये घरात चोरी विकासनगर जुना होटगी नाका येथे राहणारे सारंग दत्तात्रय कुलकर्णी यांच्या घरात चोरी झाली आहे. दहा हजार किमतीची पितळी भांडी, विविध भांडी, घड्याळ, विविध साहित्य चोरीला गेले आहे. कुलकर्णी यांनी १७ जून रोजी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. पुण्यात नातेवाईक यांचे लग्न असल्यामुळे चार दिवसांपूर्वी गेले होते. बंद घराचा कडीकोयंडा उचकटून भांडी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पर्समधून पैसे पळवले सोलापूर बसस्थानकावर बसमधून ५ हजार किमतीचा मोबाइल आणि एक हजार रुपये, पैसे आणि आधारकार्ड, पॅनकार्ड चोरांनी पळवून नेले. सुप्रिया अनिल उपळाईकर (व्हिनस अपार्टमेंट रेल्वेलाइन) यांनी १८ जून रोजी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. सुप्रिया या पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. त्यांनी आपली पर्स बाजूला ठेवली होती. नातेवाइकांना निरोप देताना बाजूला ठेवलेली पर्स चोराने पळवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.