आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज टेंडर खुले होणार:मनपाच्या इंग्रजी माध्यमात मक्तेदार पुरवणार शिक्षक; ९ पासून अमंलबजावणी

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी माध्यमांच्या महापालिका शाळांत पटसंख्या घसरत आहे. इंग्रजी माध्यमात पटसंख्या ५० वरून ७५० पर्यंत गेली आहे. महापालिका शिक्षण मंडळ आता कंत्राटी शिक्षक भरती करण्याऐवजी मक्तेदारामार्फत शिक्षक घेणार आहे. याबाबत महापालिकेने टेंडर काढले आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे.

दिवाळीनंतर ९ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत आहे. या दिवसापासून इंग्रजी माध्यम शाळांत मक्तेदारामार्फत शिक्षक येतील. सोमवारी टेंडर उघडण्यात येणार असल्याचे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी जावीर शेख यांनी सांगितले.

महापालिकेने कॅम्प शाळा येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. माजी आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी ९ शिक्षकांची मुलाखत घेऊन भरती केली. त्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्यात येत होती. त्यांचे सहा महिन्याचे करार संपल्याने कंत्राटी पद्धत बंद करण्यात येणार आहे. मक्तेदारामार्फत ९ शिक्षक घेण्यात येणार आहे. यासाठी चार मक्तेदार इच्छुक आहेत. पालिकेत मक्तेदारांकडून शिक्षक घेण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे.

किमान मानधन ८ हजार रुपये : इंग्रजी माध्यमातील शिक्षकांना किमान ८ हजार रुपये मानधन होते. त्यांना पुढील काळात ८ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय होऊ शकतो. मक्तेदारामार्फत शिक्षक घेताना त्यांना शर्थी व अटी घातल्या आहेत.

चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया
मक्तेदारांकडून शिक्षक घेण्याची महापालिका आयुक्तांची पद्धत चुकीची आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय आहे. सर्वसामान्यांना हे पटणारे नाही. शिक्षक महासंघाचा याला विरोध आहे. पालिका आयुक्त व शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांना निवेदन देऊ.''-कल्लप्पा फुलारी, जिल्हाध्यक्ष शिक्षक महासंघ

बातम्या आणखी आहेत...