आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाखरीत आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक:केसरची लागवड पाच बाय पाच मीटरपर्यंत केल्यास अधिक उत्पादन

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंबा लागवडीसाठी १० बाय १० मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु लागवड घन पद्धतीने म्हणजेच पाच बाय पाच किंवा पाच बाय सहा मीटर अंतरावर केल्यास बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली असून १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवड टाळावी.

वाखरी (ता. पंढरपूर) येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत केसर आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वेळी केसर आंब्याची लागवड कशी करावी हे सांगतानाच प्रत्यक्ष लागवड ही करण्यात आली. अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. एम.एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत तेजस पवार, आदित्य बांडे, बालाजी कर्चे, नीलेश आसबे, सूर्यकांत पाटील, जलिल शेख यांनी आंबा लागवडीसाठीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह सांगितले.

बातम्या आणखी आहेत...