आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशन झालेले मुख्याध्यापक बदलीपासून वंचित:दोनशेहून अधिक मुख्याध्यापकांचा समावेश

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात 200 हून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याने शाळा बदलेल्या आहेत. मात्र शाळा बदलून साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र बदलीसाठी किमान एका शाळेवर तीन वर्षे सेवा दिलेली असावी असा नियम असल्याने प्रमोशन झालेले नवीन मुख्याध्यापक बदलीपासून वंचित राहणार आहेत.

जिल्ह्यात ऑक्टोबर 2021 मध्ये 200 हून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाली. अनेक शिक्षक नव्याने संवर्ग एक मध्ये आले असले तरी त्यांची शाळा बदलल्याने शाळेवरील तारीख, हजर तारीख हे तीन वर्षाच्या आतील आहे.

शासनाच्या बदली निकषानुसार शिक्षकांना मागील तीन वर्षात संवर्ग 1 चा लाभ घेतला नसला तरी यांना बदली पोर्टलमध्ये बदली अर्ज करता येत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची भेट घेऊन या शिक्षकांना बदली पोर्टलमध्ये बदली मागण्याचे अधिकार द्या अन्यथा न्यायालयात जाऊ यासाठी परवानगी द्या अशी मागणी केल्याची माहिती सूर्यकांत हत्तूरे (डोगे) यांनी दिली.

तब्बल दोन वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत संवर्ग 1 मधील शिक्षकांना पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. या अनुषंगाने बदलीसाठी अर्ज करीत आहेत. अर्ज भरताना ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. शासनाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात 4.2.7. मध्ये विशेष संवर्ग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. असा उल्लेख असतांना या शिक्षकांनी यापूर्वी या बदलीचा लाभ घेतलेला नाही. यांची पदोन्नतीने शाळा बदललेली आहे. तेव्हा यांनी बदलीचा लाभ घेतले आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून पदोन्नतीने बदललेली तारीख ग्राह्य न धरता यापूर्वीच्या बदलीची तारीख ग्राह्य धरून यांना संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी केली आहे. यावेळी बाबा शेख, प्रकाश कुंभार, पिरप्पा हडपद, चंद्रकांत कमळे, आमसिद्ध बिराजदार, राजकुमार चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...