आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक अडचण:दोनशेहून अधिक मुख्याध्यापकांनी केली न्यायालयात जाण्याची तयारी

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दोनशेहून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याने शाळा बदलेल्या आहेत. शाळा बदलून साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. बदलीसाठी किमान एका शाळेवर तीन वर्षे सेवा दिलेली असावी, असा नियम असल्याने प्रमोशन झालेले नवीन मुख्याध्यापक बदलीपासून वंचित राहणार आहेत. प्रमोशन झालेल्या त्या शिक्षकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर २०२१ मध्ये २०० हून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली.अनेक शिक्षक नव्याने संवर्ग एक मध्ये आले असले तरी त्यांची शाळा बदलल्याने शाळेवरील तारीख, हजर तारीख हे तीन वर्षाच्या आतील आहे. शासनाच्या बदली निकषानुसार शिक्षकांना मागील तीन वर्षात संवर्ग १ चा लाभ घेतला नसला तरी यांना बदली पोर्टलमध्ये बदली अर्ज करता येत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची भेट घेऊन या शिक्षकांना बदली पोर्टलमध्ये बदली मागण्याचे अधिकार द्या, अन्यथा न्यायालयात जाऊ यासाठी परवानगी द्या अशी मागणी केल्याची माहिती सूर्यकांत हत्तुरे (डोगे) यांनी दिली.

तब्बल दोन वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत संवर्ग १ मधील शिक्षकांना पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. या अनुषंगाने बदलीसाठी अर्ज करीत आहेत. अर्ज भरताना ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. शासनाच्या दि. ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयात ४.२.७. मध्ये विशेष संवर्ग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. असा उल्लेख असतांना या शिक्षकांनी यापूर्वी या बदलीचा लाभ घेतलेला नाही.

यांची पदोन्नतीने शाळा बदललेली आहे. तेव्हा यांनी बदलीचा लाभ घेतले आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून पदोन्नतीने बदललेली तारीख ग्राह्य न धरता यापूर्वीच्या बदलीची तारीख ग्राह्य धरून यांना संवर्ग १ मधून बदलीचा लाभ देण्यात यावा.अशी मागणी केली आहे. यावेळी बाबा शेख, प्रकाश कुंभार, पिरप्पा हडपद, चंद्रकांत कमळे, आमसिद्ध बिराजदार, राजकुमार चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

पोर्टलबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवणार
पोर्टलवरील ही तांत्रिक दुरुस्ती असून ती वरिष्ठ कार्यालयीन स्तरावरील विषय आहे. ज्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी प्रमोशन दिले आहे. ते बदलीसाठी पात्र होत नाहीत, कारण बदलीसाठी एका शाळेवर किमान तीन वर्षे सेवा झालेली हवी, मात्र ही शिक्षकांची मागणी वरिष्ठ कार्यालयापर्यंत कळवली जाणार आहे.-संजय जावीर, प्र. शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...