आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज प्रारूप यादी:10 प्रभागांत महिला मतदार जास्त; केवळ क्रमांक 3 मध्येच लक्षणीय

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभाग १३ मध्ये सर्वांत जास्त मतदार, ३० मध्ये सर्वांत कमी

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. शहरात २०११ च्या जनगणनेनुसार ९ लाख ५१ हजार लोकसंख्या धरली आहे. मात्र ३१ मे २०२२ पर्यंत नोंदणी केलेले मतदार ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यानुसार ८ लाख ९ हजार मतदार आहेत. त्यात ४ लाख ११ हजार पुरुष, ३ लाख ९८ हजार महिला तर ८६ तृतीय पंथी मतदार आहेत. १० प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

प्रभाग क्रमांक ३, ४, ६, ८, १२, १९, २१, २७, २८, २९ मध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. यातील प्रभाग ३, ८, १२, २१, २७, २९ या सहा प्रभागात एक जागा महिलेसाठी आरक्षित आहे.

महापालिका मुख्य कार्यालय, सर्व विभागीय कार्यालये, प्रारूप यादी लावण्यात येणार आहे. याशिवाय महापालिका निवडणूक शाखेतही ती असेल. www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

२०१७ला ६ लाख ७३ हजार ९४२
शहरात सन २०१७ च्या निवडणुकीत ६ लाख ७३ हजार ९४२ मतदार होते. तर सन २०२२ च्या निवडणुकीसाठी ८ लाख ९ हजार ५३७ मतदार झाले. १ लाख ३५ हजार ५९५ मतदार वाढले आहेत. यांची टक्केवारी १६.७४ इतकी आहे. शहरात पुरुष आणि महिला मतदार संख्या पाहता पुरुषापेक्षा महिला मतदारांची संख्या १३ हजार १५९ ने कमी आहे.

प्रारूप यादीवर हरकती घेता येणार
लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले असेल तर आणि प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदरांची नांवे असूनही, महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नांवे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नांवे मतदार यादीत समाविष्ट करणे.

छापील व सीडीवर याद्या विक्री
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या निवडणूक मुख्य कार्यालय, डॉ.कोटणीस हॉल, आयसीआयसीआय बँकेच्यावर या ठिकाणी नागरिकांना विक्री करिता उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदार यादी प्रती पानास १ रुपये याप्रमाणे तर प्रत्येक प्रभागाचे मतदार यादीची सीडी १०० रुपये दराने उपलब्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीवर हरकती व सूचना २३ जून ते १ जुलै दरम्यान घेता येईल. त्यावर सुनावणी होऊन ९ जुलै राेजी अंतिम यादी जाहीर होईल.

ठळक नोंदी
तीन सदस्य असलेल्या प्रभागांत सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग १३ आहे. तिथे २७ हजार ३२९ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग ३० आहे. तिथे १६ हजार ५३८ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हे दोन सदस्यांचे आहे. भाैगोलिकदृष्ट्या प्रभाग मोठा आहे, पण तेथे मतदार १६ हजार ५३७ आहे.