आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू, सोलापुरातील पाथरीमधील घटना

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावात शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला घडली आहे.

सारिका अक्षय ढेकळे (वय 25), गौरी अक्षय ढेकळे (वय 5) आणि आरोही ढेकळे (वय 3) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला की त्यांनी मुलींसह आत्महत्या केली, याचा तपास तालुका पोलिस करीत आहे.

दरम्यान, मृत सारिका ढेकळे या त्यांच्या शेताच्या जवळ असलेल्या बागायती शेतात द्राक्ष बागेत गेल्या होत्या. त्यावेळी त्या मुलींसोबत शेत तळ्याजवळ गेले असता पाय घसरुन पडल्या की, आणखी दुसऱ्या कारणाने याचे सध्या याचे कारण अस्पष्ट आहे. पोलिस याचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...