आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा‎:आयइआय संघटनेचा 50 औद्योगिक‎ कंपन्यांसमवेत सामंजस्य करार‎

सोलापूर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयइआय‎ सोलापूर संघटना लवकर ५० औद्योगिक‎ कंपन्यांना भेटी व सामंजस्य करार करणार आहे,‎ या प्रकल्पाचे उदघाटन लक्ष्मी हैड्रालिक्स प्रा. लि.‎ येथे करण्यात आले.‎ अायइआय संघटनेच्या वीस इंजिनिअर्सनी लक्ष्मी‎ हैड्रालिक्सला भेट दिली. संचालक शरद ठाकरे,‎ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत चर्चा‎ झाली. एलएचपी व आयइआय सोलापूर सेंटर‎ यांच्यात सामंजस्य करार झाला.

संस्थापक‎ अध्यक्ष एच. एन. सोमाणी, चेअरमन एस. एम.‎ शेख यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. प्रा.‎ मोहन देशपांडे यांनी आयइआय च्या विविध‎ कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.‎ एलएचपी कंपनीतर्फे अधिकारी भारत वेदपाठक,‎ पोतदार, दाडगे, अभियंता माळी यांनी‎ कंपनीबद्दल माहिती दिली. एलएचपीचे शरद‎ ठाकरे यांनी इंजिनिअरिंग कार्यासाठी आयइआय‎ ची स्वत:ची वास्तू असावी, असे मत व्यक्त‎ केले. सीए लक्ष्मीनारायण शेराळ, बिग सीईचे‎ रवींद्र गायकवाड, डॉ. व्ही. व्ही. पोतदार, डॉ.‎ बाग, डॉ. एन. आर. पाटील, अभियंता इंदोती ,‎ डॉ. गौड , डाॅ. सचिन देटे, रोहन कुरी, डॉ.‎ तपकिरे , इंजि. शेख आदी उपस्थित होते.‎ सूत्रसंचालन भारत वेदपाठक व सचिव अभियंता‎ प्रा. मोहन देशपांडे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...