आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर मनपासमोर एमआयएमचे आंदोलन:रस्त्यासाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एआयएमआयएम पक्षाच्या वतीने आसरा चौक ते अमन चौक लोकमान्य नगरला जोडणारा रस्ता त्वरित दुरूस्त करावा यासह शहरातील सर्व खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी सोमवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने शहर आणि परिसरामध्ये विशेष करून हद्दवाढ भागातील रस्ते दिवसेंदिवस खराब होत चालले आहेत. यामुळे सर्वसामान्य वाहनचालक व स्थानिक रहिवाशांना मोठीकसरत करावी लागत आहे. त्रास होत आहे. वारंवार सांगून देखील महापालिका प्रशासनाकडून हद्दवाढ भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही. आसरा चौक ते अमन चौक लोकमान्य नगरला जोडणारा रस्ता त्वरित दुरूस्त करावा अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा एमआयएम पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आला.

सोलापूर शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. स्मार्ट सिटी म्हणायचे की खड्डेपूर म्हणायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे महापालिकेला वेळोवेळी सांगूनही कार्यवाही होत नाही. अखेर एमआयएमच्या वतीने शहरातील विविध खड्ड्यांवर महापालिका आयुक्तांचे फोन नंबर लावण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

एमआयएमचे शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या सूचनेनुसार शोएब चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रेश्मा मुल्ला, वसीम शेख, इस्सामोद्दीन पीरजादे, आशपाक बागवान, सोहेल चौधरी , शकील शेख, हाजी शेख, खलील टंगसाल यांच्यासह प्रभागातील नागरिक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...