आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील 1 कोटींचे पॅकेज सोडून विश्वराज राजकारणात:खासदार महाडिक म्हणाले- तिथेच राहा; मुलगा म्हणाला- 'घराच्या ओढीने आलो'

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिक यांनी जगातील नावाजलेल्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. कॉलेजमध्ये असतानाच विश्वराज यांना जवळपास एक कोटींच्या पॅकेजची ऑफर आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारुन कोल्हापुरात परतण्याचा निर्णय घेतला. घरची ओढ असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे विश्वराज महाडीक सांगतात.

आता राजकारणात पदार्पण

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. कारखान्याचे चेअरमन म्हणून विश्वराज धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी सुरेश जगताप यांनी बिनविरोध निवड झाली आहे. विश्वराज यांनी एक कोटींचे पॅकेज नाकारुन मायदेशी येण्याचा निर्णय घेतला व आता त्यांनी राजकारणात पदार्पण केले आहे.

10 हजार 629 एवढे मताधिक्क्य

महाडिक गटाचे म्हणजेच भीमा परिवाराचे सर्वच उमेदवार हे जवळपास सहा हजारच्या फरकाने विजयी झाले. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे 10 हजार 629 मते घेऊन विजयी झाले, तेव्हाच विश्वराज महाडिक हे भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन असतील असा कयास लावला जात होता.

महाडीकांच्या पॅनलचा विजय

भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीच्या निकालात भीमा परिवाराने दणदणीत विजय प्राप्त केला. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचं भीमा परिवार पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर होते. राजन पाटील व प्रशांत परिचारक यांचे भीमा बचाव पॅनल पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. दुसऱ्या फेरीतही महाडिक गटाने वर्चस्व स्थापित केले. माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

वडील म्हणाले तिथेच राहा

विश्वराज महाडीक यांनी दोन वर्ष नोकरी करुन भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. वडील म्हणाले होते की, तिथेच राहा, मात्र आपल्याला घराची ओढ असल्यामुळे स्वतः निर्णय घेतला, असे विश्वराज म्हणतात.

काय म्हणाले, विश्वराज?

2019 मध्ये मी भारतात परत आलो, त्यावेळी लोकसभा निवडणुकीत महाडिकांना आलेले अपयश, कारखान्यात आलेल्या अडचणी पाहिल्या. राजकारणात इंटरेस्ट कमी असला तरी कारखान्याच्या कामात मदत करण्याची इच्छा होती. यापुढे ते कारखान्यात इथेनॉल प्रकल्प राबवणार असल्याची माहिती आहे.

विश्वराज महाडिक यांचा परिचय

विश्वराज महाडिक यांचा जन्म 17 मे 1996 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातच झाले. विश्वराज महाडिक हे भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आहेत. विश्वराज हे त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील तिसऱ्या पीढीचे प्रतिनिधित्व करतात.

बातम्या आणखी आहेत...