आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाेटगी रस्त्यावरील नागरी विमानसेवेविषयी साेलापूरचे लाेकप्रतिनिधी कमालीचे गप्प असताना, खासदार धनंजय महाडिक (काेल्हापूर) यांनी राज्यसभेत जाेरदार आवाज उठवला. साेलापूरच्या हाेटगी रस्त्यावरील विमानसेवेच काय? जिल्हानिहाय ‘उडान’ याेजना राबवताना साेलापूरच्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष का? असे त्यांचे प्रश्न हाेते. महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी साेलापूर विकास मंचच्या चक्री उपाेषणाला पाठिंबा दिला हाेता. त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांना निवेदनही दिले हाेते. खासदार महाडिक यांनाही निवेदन देऊन हा प्रश्न साेडवण्याची विनंती केली हाेती. खासदार धनंजय महाडिक यांनी आक्रमक पद्धतीने साेलापूरचा हा विषय मांडला. तेही शेतकरी पुत्र आहेत. टाकळी सिकंदर (ता. माेहाेळ) येथील भीमा सहकारी साखर कारखाना त्यांच्याच ताब्यात आहे. त्यांचे चिरंजीव त्याचे अध्यक्ष झाले. असे असतानाही त्यांनी साेलापूरच्या विमानसेवेविषयी हा विषय राज्यसभेत मांडला, हे विशेष असल्याचे साेलापूर विकास मंचने म्हटले आहे.
२८ डिसेंबरला काढणार मूक माेर्चा
३० िदवस सलग चक्री उपाेषण करून साेलापूर विकास मंचने पूनम गेट येथील आंदाेलन स्थळ साेडले. हाेटगी रस्त्यावरील विमानतळ येथून नागरी सेवेला सुरुवात झाली नाही, तर २८ डिसेंबरला मूकमाेर्चा काढण्याचा निर्धार केलेला आहे. संसदेचे अधिवेशन आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा अपेक्षित आहे. सकारात्मक निर्णय झाला नाही, तर माेर्चा अटळ असल्याचे मंचने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.