आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी केली माठ्यातील नुकसानग्रस्त विभागाची पाहणी, एकनाथ खडसेंना फोन केला पण...

सोलापुर, माढा (संदीप शिंदे)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोलापुर जिल्ह्यात हवामान खाते आणि पाटबंधारे विभागाचा समन्वय नाही - खासदार रणजितसिंह निंबाळकर

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकार अकार्यक्षम असेल तर केंद्राकडे मदत मागावी. त्यासाठी पाठपुरावा करुन निधी आणणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. तसेच सोलापुर जिल्ह्यात हवामान खाते, पाटबंधारे विभागाचा समन्वय नसल्याचेही ते म्हणाले. माढ्यासह परिसरातील गावात निंबाळकर यांनी पावसाने नुकसान झालेल्या गावाना शुक्रवारी भेटी देऊन पाहणी केली. दौरा आटपुन जाताना त्यांनी माढ्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकाराशी संवाद साधला.

सोलापुर जिल्ह्यातले 100 कोटीपर्यंत नुकसान झालेले आहे. ही केंद्राकडे नुकसान भरपाई जात नाही. ही छोटी मदत द्यायला राज्य सरकार अकार्यक्षम असेल तर केंद्राकडे मागणी केल्यास मी माढ्यासाठी निधी नक्कीच आणेल. पूरस्थिती निर्माण झाल्यास बोट असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी खासदार निधीतुन सात ते आठ जण बसतील अशी एक बोट माढा तालुक्यासाठी आणणार आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांचे पंचनामे करुन मदत निधी तत्परतेने मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

कृषी विधेयकाला याच सरकारने पाठिंबा दिला होता. विधेयक निट समजुन घेतले नाही. यामधून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज करीत असताना इंटरनेट कनेक्टिंव्हिटीचा अडथळा येतो. मागील आठवड्यातच मला 10 मिनीटाच्या कामासाठी चार तास कार्यलयात थांबावे लागले. दूरसंचार निगम लिमिटेड मधुन अथवा अन्य पर्यायी यंत्रणाचा अवंलब करणार आहे. जेणे करुन नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. गैरसोय होणार नाही.

मानेगाव, केवड, मानेगाव, वाकाव, टेंभुर्णी भागातील विविध गावात भेटी देऊन व्यथा जाणुन घेतली. केवड मधील मुकबधिर तरुण शेतकऱ्याने खासदाराची भेट घेऊन हातवारे करुन झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली. पाच हजाराची मदत खासदारांनी यावेळी तातडीने दिली.

भाजपाचा निवडणूक लावण्याचा हेतु नाही
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मध्यावधी निवडणुका होतील असे म्हटले होते. त्यांविषयी बोलताना निंबाळकर यांनी आंबेडकर यांना चिमटा घेत त्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असल्याचे म्हटले. भाजपचा निवडणूक लावण्याचा कोणताही हेतू नाही. या सरकारला आम्ही सहकार्य करत आहोत. सध्या कोरोनाच्या स्थितीत टिका टिप्पणी करण्याची वेळ नाही. ती संपल्यावर राजकीय निर्णय होतील. विरोधी पक्षनेते फडणवीस देखील टीका करीत नाहीत.

खडसेना फोन लावला मात्र लागलाच नाही
राष्ट्रवादीत मंत्री एकनाथ खडसे कधी जातील असे वाटते यावर निंबाळकर म्हणाले, या दौऱ्यादरम्यान मी आज खडसे यांना गाडीतुन फोन लावला. मात्र त्यांचा फोन लागला नाही. फडणविसांनी मनधरणीसाठी फोन करायला लावला का असा प्रतिप्रश्न विचारला असता ते म्हणाले, फोनच लागला नाही तर कसली मनधरणी. त्यांचा फोन लागल्यावर काय बोलणं होते. यावर प्रतिक्रिया देणे उचित ठरेल.

मदिरालय उघडी चालतात मग देवालय बंद का?
राज्यातील मदिरालय उघडी असलेली चालतात. मोठ्या रांगा त्यासाठी लागतात. शेतकरी व नागरिक धार्मिक असतात. धर्म, देवपंत, लोकांच्या भावना अवंलबुन असलेल्या देवाची मंदिरे (देवालय) उघडणे गरजेची आहेत. आम्ही त्यासाठी आंदोलने करीत आहोत. असे म्हणताच कोल्हापुरातील आंदोलनादरम्यान महालक्ष्मी मंदिरात भाजपा महिला कार्यकर्त्याच्या अंगात आलेल्या विषयावर छेडले असता त्यांनी मला हा प्रकार माहितीच नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

बातम्या आणखी आहेत...