आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:खासदार सुप्रिया सुळे कोणतीही नवी जबाबदारी स्वीकारणार नाहीत : शरद पवार

पंढरपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारून निवृत्तीची घोषणा मागे घेतल्यानंतर शरद पवार पंढरपुरात पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊ नये यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. कुणीही तर्कवितर्क लावले तरी सुप्रिया सुळे कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाहीत.

खा. पवार हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील बायो सीएनजी प्रकल्प भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार असल्याचे पवारांनी जाहीर केले. राज्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. तो निर्णय काय असेल हे मी सांगू शकत नाही, मात्र तो निर्णय फडणवीस यांना माहिती असावा. त्यामुळेच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणत असावेत, अशी टिप्पणी पवारांनी केली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात फडणवीस प्रचाराला
पवार म्हणाले की, कर्नाटकात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करीत असताना फडणवीस तेथे समितीच्या विरोधात प्रचाराला गेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.