आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकच ताल, सुरामध्ये ५० बाल वारकऱ्यांच्या पथकाने मृदंग वादन करून वारकरी सांप्रदायिक शिस्त, एकात्मिकतेचे दर्शन घडविले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेतर्फे मृदंग तपस्या हा कार्यक्रम २२ ते २९ मे दरम्यान घेण्यात आला. महादेव मंदिर, जुनी लक्ष्मी चाळ येथे हा मृदंग तपस्या कार्यक्रम पडला.
वारकरी विद्यार्थ्यांना याठिकाणी कीर्तनामध्ये, भजनामध्ये, भारुडामध्ये मृदंग कसा वाजवावा याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये शास्त्रीय, सांप्रदायिक मृदंग वादन याचाही अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात असल्याची माहिती, अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले यांनी दिली.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासठी श्री गुरू स्वामी महाराज राशीनकर, अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, तबला अलंकार प्रभाकर वाघचवरे, अखिल भाविक वारकरी मंडळ जिल्हा उपाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, संगीत विशारद सदाशिव चवरे, संजय महाराज पाटील, बळीराम महाराज जांभळे, अरुण भोसले, मोहनतात्या शेळके, दत्तात्रय महाराज भोसले, गणेश महाराज वारे, किरण शेटे, सुनील चांगभले, बजरंग महाराज डांगे, मारुती लोंढे, सुरेश गुंड, उत्तम ठाकर आदी वारकरी भाविक महाराज मंडळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.