आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Muharram Panja Procession Started After Fateh Khani; Traditional Musical Instruments Chanted In Procession By Large Muslim Children| Marathi News

मोहरमच्या मिरवणुकीला सुरुवात:फातेहाखानीनंतर निघाली मोहरम पंजांची मिरवणूक; बडे मुस्लिम बच्चे पंजाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा निनाद

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढोल, ताश, हलगीच्या पारंपरिक वाद्यात साखर पेठ येथून बडे मुस्लिम बच्चे पंजाची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. मोहरमनिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पंजांच्या मिरवणुकीला गुरुवार सायंकाळपासून सुरुवात करण्यात आली. बडे मुस्लिम बच्चे पंजाच्या मिरवणुकीनेच मोहरमच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक मोघल यांच्या हस्ते फातेहाखानी करण्यात आली.

यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या फातेहाखानीच्या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पोलिस प्रशासनाला मान दिला जातो. फातेहाखानी होताच भक्तिमय वातावरण मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना बँजोची साथ मिळत होती. बँजोवर सुद्धा पारंपरिक धून वाजवण्यात येत होती. यावेळी एक रथ तयार करण्यात आला होता. यामध्ये माइकद्वारे मोहरमचे गीत सादर केले जात होते. मिरवणूक मार्गावर आतषबाजी करण्यात येत होती. विजापूर वेस, माणिक चौक, दत्त चौक, आसार मैदान अशा मार्गाने मिरवणूक काढून पुन्हा प्रतिष्ठापना केलेल्या जागेवरच मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकी मध्ये मोहरम कमिटीचे अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर, राम गायकवाड, मतीन बागवान, पीरअहमद शेख, इक्बाल दुर्वेश, बाबा मोहोळकर, यांच्यासह सर्व पदाधिकारी, मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता.

बालकांना वाघासारखे रंगवले... सायंकाळी पाच वाजल्यापासून मिरवणुकीसाठी गर्दी होत होती. गुरुवारी सकाळपासूनच भक्तगण प्रसाद घेऊन येत होते. अनेकजणांनी मन्नतनुसार लहान बाळांना वाघासारखे रंगवले होते. दुपारपासून सवारीला विविध फुलांनी सजवण्याचे काम सुरू होते. बडे मुस्लिम बच्चे सवारीची मिरवणूक साखर पेठ तर छोटे मुस्लिम बच्चे सवारीची मिरवणूक बेगम पेठ येथून काढण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...