आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिखर शिंगणापूर येथील बहुरूपी समाजातील दीपक शेगर आपली कला सादर करत भटकंती करत होता. मंगळवेढ्यात कला सादर करण्यासाठी आला तेव्हा येथील वकिलाच्या मदतीने तो शिक्षणाच्या वाटेवर आला.पोलिसाची भूमिका करून उदरनिर्वाहासाठी भटकणारा दीपक अॅड. दत्तात्रय खडतरे यांच्या घरी आला. अॅड. खडतरे व सजग नागरिक संघाच्या सदस्याच्या मदतीने दीपक व त्याच्या कुटुंबीयांचे मतपरिवर्तन करून त्याला टेंभुर्णीच्या आश्रमशाळेत पाठवले.
रविवारी अॅड. दत्तात्रय खडतरे यांच्या घरी दीपक कला सादर करायला आला होता. तेथे सजग नागरिक संघाचे सदस्य बोराळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र वाघमारे, लेखा परीक्षक मधुकर भडंगे उपस्थित होते. दीपकची विचारपूस केली तेव्हा तो टेंभुर्णी येथील आश्रमशाळेत शिकत असल्याचे त्याने सांगितले. आई-वडील वडदेगाव (ता. मोहोळ) येथे ऊसतोडीच्या कामासाठी आले आहेत.परिस्थितीमुळे शाळेत न जाता बहुरूपी कला सादर करत गावोगावी फिरत होता. मंगळवेढ्यात आल्यावर सजग नागरिक महासंघाच्या सदस्यांनी त्याचे मत परिवर्तन करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याला परत शाळेत जाण्यासाठी तयार केले.
त्यासाठी त्याच्या सर्व नातेवाइकांना फोन लावून कौटुंबिक माहिती घेतली. टेंभुर्णीच्या आश्रमशाळेचे प्रमुख कैलास सातपुते यांना महिती देण्यात आली. सदर आश्रमशाळेने तातडीने निर्णय घेऊन त्या विद्यार्थ्याला दहावीत बसून त्याचा फॉर्म भरून सहकार्य करू, असे आश्वासन दिले. आई-वडिलांनीही दीपकला शाळेत पाठवण्याची तयारी दाखवली. त्यावेळी दीपक शेगर या विद्यार्थ्यांचा संत दामाजी पुतळ्यासमोर या सजग नागरिक संघाच्या सदस्यांनी सत्कार करून करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी अॅड. दत्तात्रय खडतरे, मुख्याध्यापक रवी वाघमारे, लेखापरीक्षक मधुकर भडंगे, सेवानिवृत्त कृषी कर्मचारी भीमसेन माळी, डोंगरगावचे माजी सरपंच यशवंत आकळे, माजी नगरसेवक अंकुश शेंबडे, आनंद ढावरे, दामाजी हेंबाडे आदीजण उपस्थित होते.
खरा पोलिस होऊन येईन, आता बहुरूपी म्हणून आलाेय मनपरिवर्तन झाल्यानंतर विद्यार्थ्याने एवढे दिवस डुप्लिकेट पोलिस म्हणून कला सादर करत होतो ,आज मला शिक्षणासाठी बळ मिळाले असल्याने मी पदवीधर होऊन एक दिवस खरा खराखुरा वास्तववादी पोलिस होईन अशी जिद्द मनाची बाळगेन अशी ग्वाही दीपकने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.